Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | darpan award for tryambak kaapade

त्र्यंबक कापडे यांना दर्पण पुरस्कार

प्रतिनिधी | Update - May 19, 2013, 12:16 PM IST

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्यालयाचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे

  • darpan award for tryambak kaapade

    पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्यालयाचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे यांना, तर महिला दर्पण पुरस्कार ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर- पांडे यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, अडीच हजार रुपये रोख, जांभेकर चरित्र, माहितीपट, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या पुरस्काराचे हे 21 वे वर्ष आहे.

    दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकार
    औरंगाबाद विभाग- अंकुश गायकवाड ( दै. पुरोगामी मराठवाडा, जालना), नाशिक विभाग- त्र्यंबक कापडे (ब्युरो चीफ, दै. दिव्य मराठी), पुणे विभाग- सुधाकर राजाराम काशीद (दै. सकाळ, कोल्हापूर), कोकण विभाग- सतीश कामत (दै. लोकमत, रत्नागिरी), अमरावती विभाग- अनिल कुचे (दै. सामना, अमरावती), नागपूर विभाग-(वामन तुरिले, दै. लोकसत्ता, भंडारा) आणि ज्येष्ठ पत्रकार - साहित्यिक यशवंत पाध्ये पुरस्कृत ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार-साहित्यिक पुरस्कार’ राजा माने (संपादक, दै. लोकमत, सोलापूर) यांना जाहीर झाला आहे.

Trending