आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅन्डोझ कंपनीच्या रिएक्टरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाड- महाड औद्योगिक वसातीमधील सॅन्डोझ या कंपनीत रिएक्टरमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिन हरपळकर असे या कामगाराचे नाव आहे. सचिन हा सॅन्डोझ कंपनीत मागील दोन वर्षापासून प्लॅन्ट ऑपरेटर म्हणून नोकरी करत होता. तो सातारा जिल्ह्यातील धामणी गावातील रहिवासी होता.
शनिवारी रात्रीच्या आठच्या सुमारास कंपनीतील एका रिअँक्टरमध्ये रासायनिक पावडर टाकत असतांना त्याच्या हातात असलेली बॅग खाली पडल्याने ती काढण्यासाठी तो वाकला असता त्याचा तोल जाऊन तो रिअँक्टरमध्ये पडला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.