Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Fatal accident on Mumbai-Goa highway

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू, मुंबईतील कुटुंबावर शोककळा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 29, 2015, 01:42 PM IST

मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यावर अनेक भीषण अपघात झाले आहेत.

  • Fatal accident on Mumbai-Goa highway
    रत्नागिरी- टोयोटा इटिऑस ही आलिान कार आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मुंबई-गोवा महामार्गावर तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
    मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. हा महामार्ग अपघात प्रवण असल्याने त्यात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे.
    मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात मुंबईतील लालबाग-परळ भागातील एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दीड वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Trending