Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | fire in malvan vayarkar zopadi

वायरी भूतनाथ येथील वायरकर वस्तीला आग; 42 कुटुंब उघड्यावर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 23, 2011, 04:11 PM IST

मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील वाइरकर रापणकार संघाच्या वस्तीला लागलेल्या आगीत 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • fire in malvan vayarkar  zopadi

    सिंधुदूर्ग: मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील वाइरकर रापणकार संघाच्या वस्तीला लागलेल्या आगीत 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत सहा होड्या, मच्छीमारी जाळी, घरगुती साहित्य तसेच साडेचार लाख रुपयांची रोकड खाक झाली आहे. आगीमुळे वस्तीतील 42 कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ही आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
    सोमवारी (ता. 21) रात्री वाइरकर रापणकार संघाचे मच्छीमार तारकर्ली येथे मच्छीमारीसाठी गेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी समुद्रात टाकलेले रापण ओढण्यासाठी तारकर्ली येथे गेले होते. त्यानंतर अचानक वायरी भूतनाथ येथील वाइरकर रापणकार संघाच्या झोपड्यांना आग लागली. स्थानिक मच्छीमारांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यांना अपयश आले. अग्निशामक दलानेही आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत वाइरकर रापणकार संघाचे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉटसर्कीटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी जरी व्यक्त केला असला, तरी या मागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला आहे.Trending