खेड तालुक्यात लागलेल्या आगीत 20 एकरांवरील बाग नष्ट
दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 18, 2013, 12:47 PM IST
तालुक्यात सोमवारी (ता.15) सुकिवली सोनारवाडी येथे लागलेल्या आगीत आंबा आणि काजूची बाग जळून खाक झाली.
-
खेड - तालुक्यात सोमवारी (ता.15) सुकिवली सोनारवाडी येथे लागलेल्या आगीत आंबा आणि काजूची बाग जळून खाक झाली. बागयतदार प्रभाकर मोरे यांच्या आंबा आणि काजू बागेस सोमवारी आग लागली. यात मोरे यांची 20 एकरांवरील बाग आगीत पूर्णपणे नष्ट झाली. यात लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले. मात्र वारा असल्याने आग नियंत्रणात आली नाही. आगीची माहिती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी पोहोचण्यास अग्निशामक दलाला उशीर झाल्याने सर्व बाग आगीत नष्ट झाली. संध्याकाळी उशीरापर्यंत आग विझवण्यात यश मिळाले.