Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Former Deputy Collector Arresting Order

माजी उपजिल्हाधिकारी ठाकूरच्या अटकेचे आदेश

प्रतिनिधी | Update - Apr 24, 2013, 01:59 AM IST

कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा जामीन विशेष न्यायालयाने रद्द केला आहे.

  • Former Deputy Collector Arresting Order

    अलिबाग - कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा जामीन विशेष न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच त्याला अटक करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.


    रायगड येथे उपजिल्हाधिकारी पदावर असताना ठाकूर याने 118 कोटी 39 लाख 816 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली होती. मात्र 90 दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात ‘एसीबी’ला अपयश आल्याने न्यायालयाने तेव्हा ठाकूरला जामीन मंजूर केला होता. मात्र त्याच वेळी तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची अट घातली होती. मात्र आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार एसीबीने न्यायालयात केली होती. तीन एप्रिल रोजी न्यायालयाने ठाकूर यास 8 एप्रिल रोजी कोर्टात पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, मंगळवारी विशेष न्यायालयाने एसीबीच्या तक्रारीची दखल घेत ठाकूर याचा जामीन रद्द केला.

Trending