Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | grand welcome of rashtravadi congress party new state president bhaskar jadhav

राष्‍ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्‍यक्ष भास्‍कर जाधव यांचे जल्‍लोषात स्‍वागत

दिव्‍य मराठी नेटवर्क | Update - Jun 17, 2013, 11:50 AM IST

जाधवांचे मंत्रीपद गेल्‍यामुळे जाधव समर्थक कमालीचे नाराज झाले होते. परंतु, दोनच दिवसांत जाधव यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नेमण्‍यात आल्‍यामुळे कोकणात एकच जल्‍लोष करण्‍यात आला.

  • grand welcome of rashtravadi congress party new state president bhaskar jadhav

    मोरवंडे- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्‍यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्‍कर जाधव यांचे भरणे नाका येथे रविवारी जंगी स्‍वागत करण्‍यात आले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही जाधव यांच्‍या स्‍वागतासाठी कार्यकर्त्‍यांनी मोठी गर्दी केली होती.

    प्रदेशाध्‍यक्ष पद भूषवणारे जाधव हे कोकणातील पहिले नेते आहेत. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पक्षाच्‍या मंत्र्यांची खांदेपालट केली. त्‍यावेळी त्‍यांनी भास्‍कर जाधव यांचे नगरविकास व पालकमंत्री पद काढून रत्‍नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्‍याकडे दिले होते. जाधवांचे मंत्रीपद गेल्‍यामुळे जाधव समर्थक कमालीचे नाराज झाले होते. परंतु, दोनच दिवसांत जाधव यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नेमण्‍यात आल्‍यामुळे कोकणात एकच जल्‍लोष करण्‍यात आला.

Trending