Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Guhaghar Municipal Council Chairman Jaidev More, Vice Chairman Sneha Warande

गुहागर नगरपंचायतीच्या अध्‍यक्षपदी जयदेव मोरे, उपाध्‍यक्षपदी स्नेहा वरंडे यांची निवड

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 30, 2013, 12:54 PM IST

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयदेव मोरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्षपदीतर, स्नेहा वरंडे यांची उपनगराध्‍यक्षपदी सोमवारी निवड करण्‍यात आली.

 • Guhaghar Municipal Council Chairman Jaidev More, Vice Chairman Sneha Warande

  गुहागर - राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जयदेव मोरे यांची गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्षपदीतर, स्नेहा वरंडे यांची
  उपनगराध्‍यक्षपदी सोमवारी निवड करण्‍यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले.

  गुहागर नगरपंचायतीचे अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्ष ही दोन्ही पदे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली आहे. 17 नगरसेवकांपैकी मोरे यांना 11 मते मिळाली. त्यांच्याविरूध्‍द उभा असलेल्या गजानन वेल्हाळ यांना 6 मते पडली. स्नेहा
  वरंडे यांना 11 मते, तर ज्योती परचुरे यांना 6 मते पडली. विजयानंतर पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत
  नगराध्‍यक्ष मोरे आणि उपनगराध्‍यक्ष वरंडे यांची शहरातून मिरवणूक काढण्‍यात आली.

Trending