Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Hapoos Going To America

हापूस निघाला अमेरिकेला

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 16, 2013, 12:05 PM IST

ब-याच मध्‍यांतरानंतर रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात मंगळवारपासून (ता.14) अमेरिकेला सुरू करण्‍यात आली आहे.

  • Hapoos Going To America

    रत्नागिरी - ब-याच मध्‍यांतरानंतर रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात मंगळवारपासून (ता.14) अमेरिकेला सुरू करण्‍यात आली आहे. पणन मंडळाच्या रत्न‍ागिरीतील पॅकहाऊसमधून दीड टन हापूस हा अमेरिकेकडे रवाना झाला आहे.

    खराब हवामानामुळे आंब्याचे प्रत्येक हंगामात उत्पादन कमी मिळते. याचा परिणाम कमी करण्‍यासाठी पणन मंडळाने आंबा उत्पादकांना परदेशी बाजारपेठ खुली करून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 2007 सालापासून रत्नागिरीतून हापूसची
    अ‍मेरिकेला निर्यात सुरू करण्‍यात आली आहे. या निर्यातीचा फायदा आंबा उत्पादक व व्यापारी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.

Trending