आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वार्‍यासह कोकणात मुसळधार पाऊस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- कोकणात रत्नागिरीसह सिंधुदूर्ग आणि रायगडमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या 48 तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

एक जूनला केरळ किनारपट्टीवर दाखल झालेला मान्सून बरोबर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पावसाने मुंबईसह उपनगरात धुव्वाधार बॅटींग सुरु करून मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊन मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीपासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसासह वादळ सुरू आहे. वादळाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे मुंबई- गोवा महामार्गावरील आंबोली घाट धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहने सवकाश चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी शहरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. रत्नागिरीत 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.