Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | House Broken In Gimvane

दापोलीतील गिम्हवणे येथे घरफोडी; चोरट्यांचा शोध सुरू

दिव्य मराठी नेटवर्क | Update - May 27, 2013, 12:26 PM IST

गिम्हवणे (ता.दापोली) येथे चोरट्यांनी घरफोडून मौल्यवानवस्तूंची ऐवज लंपास केले

  • House Broken In Gimvane

    दापोली - गिम्हवणे (ता.दापोली) येथे चोरट्यांनी घरफोडून मौल्यवानवस्तूंची ऐवज लंपास केले.गिम्हवणे येथील रहिवाशी असलेले सखाराम देसाई व त्यांची पत्नी काही कामानिमित्त रत्नागिरी येथे गेले होते. देसाई यांच्या घराची चावी सासरे राजाराम मडव यांच्याकडे होती. सोमवारी(ता.20) सकाळी मडव घरातील विद्युत दिवे बंद करण्‍यासाठी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. या घटनेबाबत त्यांनी देसाई यांना माहिती दिली.


    देसाई यांनी पोलिसांकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवली. चोरली गेलेल्या मौल्यवान वस्तूंमध्‍ये 25 हजार 500 रूपयांचे दोन सोन्यांची नाणी, दोन साखळ्या, मंगळसूत्र, दोन अंगठ्या असे एकूण 69 हजार रूपयांचा ऐवज लंपास करण्‍यात आला आहे.
    त्या अज्ञात घरफोड्यांचा शोध पीएसआय डी.एस.पोरे करत आहेत.

Trending