आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Asset Case: Suspended Deputy Collector Jailed

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: निलंबित उपजिल्हाधिका-याचा भाऊ नीलेश ठाकूरला कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग - कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आरोपी असणारा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा भाऊ नीलेश यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नितीशची कोट्यवधीची मालमत्ता नीलेशच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने मंगळवारी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


नितीश ठाकूर याने सुमारे 221 कोटी 79 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आपला भाऊ नीलेश व आईच्या नावे केली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार नीलेशला अटक करण्यात आली. 11८ कोटी 39 लाख 81६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा नितीशवर आरोप आहे. त्याने विविध कंपन्यांध्ये 258 कोटींची गुंतवणूक केल्याचेही उघडकीस आले होते. या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. मात्र, तपासात सहकार्य करावे या अटीवर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, सुटका झाल्यापासून नितीशने तपासात सहकार्य केले नाही. तसेच 1 एप्रिल रोजी नेपाळ येथे जाण्याच्या तयारीत असताना मुंबई विमानतळावर त्याला रोखण्यात आले होते. 23 एप्रिल रोजी न्यायालयाने जामीन रद्द करून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते, मात्र तेव्हापासून नितीश ठाकूर फरार झाला आहे.