Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Is This Country Shivray, Vivekanand ? - Vinod Tawade

हा देश छत्रपती शिवराय , विवेकानंदांचा का ? - विनोद तावडे

प्रतिनिधी | Update - Apr 26, 2013, 03:02 AM IST

महाराष्‍ट्रात व देशात गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता हा देश छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंदांचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

  • Is This Country Shivray, Vivekanand ? - Vinod Tawade

    अलिबाग- महाराष्‍ट्रात व देशात गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता हा देश छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंदांचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीत तरुणांत स्फूर्ती जागविण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.


    किल्ले रायगडावरील पोलिसांची मानवंदना पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन देतानाच आमदारांचा शपथविधीही रायगडावरच व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार भरत गोंगावले, आमदार विनायक मेटे, शिवचरित्रकार विजय देशमुख आदी उपस्थित होते. शिवरायांचा आदर्श ठेवून आमदारांनी रायगडावर शपथ घेतल्यास विधानभवनातील घटना पुन्हा घडणार नाहीत, असा टोलाही तावडेंनी लगावला. गडावरील विकास कामे वर्षभरात पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
    मेटे म्हणाले, आपण केवळ शिवभक्त म्हणून दरवर्षी येथे येतो. सरकार कोणाचे आहे हे महत्त्वाचे नसून रायगडासाठी व छत्रपतींच्या स्मारकासाठी ताकद लावण्याची गरज आहे. राज्यातील आमदार तर सोडा पण किती मंत्र्यांनी रायगडावर येऊन राजांना मानवंदना दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Trending