कळवंडे धरणाला गळती / कळवंडे धरणाला गळती ; मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले

प्रतिनिधी

Jul 20,2012 12:30:40 PM IST

चिपळूण- चिपळून तालुक्यातील कळवंडे धरणला गळती लागली आहे. गळती लागल्याने धरणातील पाणीसाठा वाहून जात असून धरणाच्या करण्यात आलेल्या दुरूस्तीची चौकशी करण्याची मागणी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे करणार आहेत.
कळवंडे धरण 1980 साली बांधण्यात आले होते. अडीच कोटी रुपये खर्च करून धरणाचे दुरुस्तीचे काम नोव्हेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आले होते. हे दुरूस्तीचे काम 2012 नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. सध्याची कामाची स्थिती पाहता हे काम वेळेत पुर्ण होईल याची खात्री नसल्याने आणि गळतीमुळे पाणी वाहून गेल्याने पुढील वर्षात कळवंडे गावात पाणीटंचाईची निर्माण होण्याची शक्यता चिन्हे आहेत.
कालव्याच्या मार्गावर मातीचा भराव टाकून पिचिंग करण्यात आले होते. पावसाच्या पाण्याने हा टाकलेला भराव वाहून गेला आणि केलेले पिचिंग खचले. पावसाळा सुरू असल्याने विहिरींच्या दुरुस्तीची कामे करणे शक्य नसून आता ती पुढील वर्षी मे महिन्याच्या अखेरीस करावी लागणार आहेत. विहिरींच्या डागडूजीसाठी त्यातील पाणी सोडून द्यावे लागणार आहे त्याचा परिणाम कळवंडे गावच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कळवंडे धरणात 1.927 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा साठवुन ठेवण्याची क्षमता आहे.

X
COMMENT