कशेडी घाटात दरड / कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई - गोवा महामार्ग दोन तास वाहतूक ठप्प

प्रतिनिधी

Jun 28,2012 02:41:40 PM IST

खेड - कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली होती. बुधवारी दुपारी ही दरड कोसळली. गेल्या वर्षीदेखील महामार्गावर याच ठिकाणी दरड कोसळली होती. दरड आणि माती जेसीबीच्या सहाय्याने काही वेळातच साफ करण्यात आली. त्यानंतर वाहतुक सुरु झाली मात्र, वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहने चालवित होती.
मागील वर्षी ज्या तीन ठिकाणी दरड कोसळली होती यंदाही तिथेच दरड कोसळली आहे. यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने मोठी हानी टळली. फार जोराचा पाऊस नसतांना दरड कोसळत आहे. पावसाने जोर धरला तर काय होईल अशी भीती आता नागरीक आणि वाहन चालकांना सतावत आहे.

X
COMMENT