Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Kokan Crime News

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू, चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथील घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 03, 2014, 09:55 AM IST

दोन दिवस नळाला पाणी आले नसल्यामुळे कठडा नसलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दर्शना संजय आग्रे यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

 • Kokan Crime News
  चिपळूण - तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला विहिरीला कठडा नसल्याने विहिरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव दर्शना संजय आग्रे (32) असे आहे. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या मागे पती आणि तीन लहान मुली असे कुटुंब आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  खेरशेत बेंडलवाडी येथे दोन दिवसांपासून नळाला पाणी आले नाही, त्यामुळे दर्शना संजय आग्रे (32) या मंगळवारी सकाळी श्वेता सुरेश बेंडल (40), अमिता अनंत बेंडल (14), रोशन राजेंद्र बेंडल (19), तानू गणू बेंडल (70), यांच्यासह घाणेवड येथील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीला कठडा नसल्यामुळे तिथे लाकडाचे ओंडके टाकण्यात आले होते. त्यावर उभे राहून सर्वजण पाणी शेंदत असताना ओंडके तुटले आणि त्यासोबत सर्वजण विहिरीत पडले. मात्र, श्वेता बेंडल, अमिता बेंडल, रोशन बेंडल, तानू बेंडल यांनी विहिरीच्या दगडांना पकडून जीव वाचवला. त्याचवेळी दर्शना या थेट विहिरीत कोसळल्या आणि एक-दोन वेळेस गंटागळ्या खाल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला.
  दगडांना पकडून असेलेल्या इतर बेंडल कुटुंबियांनी आरडाओरड करुन मदतीची याचना केली. त्यांच्या आवाजाने जवळ असलेल्या ग्रामस्थांनी इतर चौघांना वाचवले.
  दर्शना यांना सृष्टी, प्रिया, पूर्वा या तीन मुली आहेत. आईच्या आकस्मिक निधनाने त्यांना दुःखावेग आवरणे कठीण झाले होते.

  छायाचित्र : विहीरीचे संग्रहित छायाचित्र.

Trending