चिपळूण तोडफोड प्रकरणी / चिपळूण तोडफोड प्रकरणी खासदार निलेश राणेंची चौकशी

दिव्य मराठी नेटवर्क

Nov 12,2011 06:53:45 PM IST

रत्नागिरी: चिपळूणमध्ये दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी कॉग्रेसचे खासदार निलेश राणे यांच्यासह चार जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शनिवारी रत्नागिरीत खा. राणे यांची चौकशी करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे त्यांनी सां‍गितले आहे.
दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी रास्तारोको आंदोलन केले होते. मात्र, त्याच दिवशी राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती असा आरोप खा. राणे यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे कोकणात राष्ट्रवादी विरुध्द कॉंग्रेस अशी जंपल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्योग मंत्री नारायण राणे आणि नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडत होत्या. त्यामुळे कोकणात आघाडी अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र कोकणातील या दोन्ही मंत्र्यांना आपापल्या पक्षश्रेष्ठींकडून तंबी मिळाल्यानंतर सध्या दोघेही शांत आहेत.

X
COMMENT