Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | konkan graduate constituency election nilesh chavan ncp

पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकशाही नावापूरतीच - निलेश चव्हाण

प्रतिनिधी | Update - Jun 30, 2012, 03:04 PM IST

पक्षाने कुणालाही विचारात न घेता निरंजन डावखरे यांना उमेदावारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निलेश चव्हाण यांनी केला.

  • konkan graduate constituency election nilesh chavan ncp

    रत्नागिरी - कोकण पदवीधर मतदारसंघातून माझी दावेदारी सरुवातीपासून आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठांकडे संपर्कदेखील साधला होता, मात्र पक्षाने कुणालाही विचारात न घेता निरंजन डावखरे यांना उमेदावारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निलेश चव्हाण यांनी केला.
    तसेच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचा खुलासा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
    ते म्हणाले, पदविधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मी २००३ पासून काम करत आहे. १४ हजार मतदारांची नोंदणी स्वखर्चाने केली. असे असताना पक्षाने उमेदवारी देताना आपल्यावर अन्याय केला. मतदारसंघाची कोणतीही माहिती नसलेल्या निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादीमध्ये केवळ बोलण्यासाठीच लोकशाही असल्याचा आरोप करत चव्हाण म्हणाले, पक्षाने प्रथम उमेदवारी जाहीर केली आणि नंतर उपचार म्हणून मुलाखतीची प्रक्रीया पार पाडली.
    आता तुमची रणनिती काय असणार यावर चव्हाण म्हणाले, यापूढे राज ठाकरेंच्या मनसेमध्ये काम करणार आहे.

Trending