कोकण रेल्वेच्या पावसाळी / कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची सुरुवात 10 जूनपासून

प्रतिनिधी

Jun 07,2012 04:46:31 PM IST

रत्नागिरी: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या 10 जूनपासून करण्यात येणार आहे. यामुळे 10 जूनपासून 31 ऑक्टोबपर्यंत या मार्गावरून धावणार्‍या काही गाड्यांची वेळ काहीशी बदलणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने दरडी कोसळण्याची भीती असलेल्या भागातून रेल्वे गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेऊन कोकण रेल्वेकडून पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आखण्यात येते.
दरम्यान, रत्नागिरीसह कोकणात पावसाला प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसात 30 मि‍मी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.

X
COMMENT