Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Konkan Railway Stopped Due to Wagnor Sliding

मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प

प्रतिनिधी | Update - Apr 27, 2013, 02:48 AM IST

रोहा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने कोकणात जाणा-या व मुंबईकडे येणा-या रेल्वेगाड्यांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

  • Konkan Railway Stopped Due to Wagnor Sliding

    अलिबाग - रोहा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने कोकणात जाणा-या व मुंबईकडे येणा-या रेल्वेगाड्यांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली, त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.


    मुंबईकडून कोकणकडे जाणारी मालगाडी रोहा रेल्वेस्थानकाजवळील फाटकाजवळ घसरली. या गाडीचे चाक रुळावरून घसरल्याने रोह्याहून दिवा येथे जाणारी प्रवासी गाडी थांबवावी लागली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.


    रोहा, नागोठणे, मुंबई, अलिबाग आणि जवळच्या गावांकडे जाणारी रस्ते वाहतूकही यामुळे बंद करावी लागली. त्यामुळे प्रवाशांना कोलाड आणि साळाव मार्गाचा वापर करावा लागला. ऐन फाटकावरच गाडी बंद पडल्याने रूळ ओलांडणा-या दुचाकी, चारचाकी वाहनांनाही दोन्ही बाजूंना तिष्ठत राहावे लागले. रात्रीपर्यंत रूळ दुरुस्तीचे काम सुरू होते.

Trending