आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Konkan Railway Traffic Halted As Mud Comes On Track Near Ratnagiri

कोकण रेल्‍वेची वाहतूक सुरु, रत्नागिरीजवळ विलवडेत रुळांवर आली होती माती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- कोकण रेल्‍वेला यंदाच्‍या पावसाळ्यातील पहिला फटका बसला. रत्नागिरीजवळ विलवडेजवळ रुळांवर माती आल्‍यामुळे कोकण रेल्‍वेची वाहतूक काही तासांसाठी बंद पडली होती. माती हटविल्‍यानंतर वाहतूक सुरु करण्‍यता आली असून जनशताब्दी एक्‍स्‍प्रेस आणि नेत्रवती एक्‍स्‍प्रेस रवाना करण्‍यात आल्‍या आहेत. सुमारे 3 तास वाहतूक ठप्‍प होती.

काही दिवसांपासून कोकणात संततधार पाऊस सुरु आहे. त्‍यामुळे रुळांवर माती आली. माती काढण्‍याचे काम सुरु करण्‍यात आले होते.