कोकण विभागासाठी स्वतंत्र / कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्डाला सरकारची मंजुरी

प्रतिनिधी

Oct 18,2011 01:02:20 AM IST

पुणे: कोकण विभागासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापण्यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदर्ग अशा अवघ्या दोन जिल्ह्यांसाठी असलेले कोकण विभागीय मंडळ हे राज्यातील सर्वात लहान विभागीय मंडळ हे राज्यातील सर्वात लहान विभागीय मंडळ ठरणार असून, रत्नागिरीमध्ये मंडळाचे मुख्यालय असणार आहे. कोकणासाठी स्वतंत्र बोर्ड असायला पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी प्रत्यक्षात उतरत असली तरी या मंडळातून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. मार्च 2012 मध्ये होणा-या दहावी- बारावी बोर्डाच्या परिक्षेपूर्वी राज्यातील हे नववे विभागीय मंडळ कार्यान्वित होणार आहे.

X
COMMENT