कुडाळमध्ये लॉज मालकाचा / कुडाळमध्ये लॉज मालकाचा खून, आरोपी अटक

प्रतिनिधी

Oct 19,2011 02:27:06 PM IST

सिंधुदुर्ग - कुडाळ येथील श्रीकृष्ण लॉजचा मालक राजन यशवंत परब याचा गळा आवळून व ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडल्याचे उघड झाले, त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राजन परब याचा खून करून मारेक-यांनी त्याचा मृतदेह नारूर माल्येवाडीच्या जंगलात फेकून दिला होता.
राजन यांच्या पत्नीचा मामा सुरेश रामचंद्र ढवळ (रा. नारूर सरनोबतवाडी ) याने खुनाची कबुली देऊन जंगलात टाकलेल्या मृतदेह दाखविला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा राजन यशवंत परब याच्यावर अनेक गुन्हा दाखल होते. तसेच खुनाच्या गुन्ह्यातून तो निर्दोष सुटला होता. एका अनैतिक गुन्ह्यात त्याचा सहभाग होता.
मंगळवारी तो बेपता असल्याने कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये त्याची तक्रार दाखल करण्यात आली. तसेच काही स्थानिकांकडूनही पोलिसात त्याच्याविषयी विचारणा होत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, नारूर येथील त्याच्या पत्नीच्या मामाकडे पोलिसांनी चौकशी केली असता, राजन व त्याचा एक मित्र सोमवारी मोटारसायकलने आले होते असे सांगण्यात आले. त्यांनी आपणास हूल देऊन शिवीगाळ करून धमकावल्याचे ढवळ यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता त्यांना सुरेश ढवळवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी सुरेश रामचंद्र ढवळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे राजन परबची आणखी चौकशी केली आसता त्याने व त्याचा भाऊ अंकुश या दोघांनी मिळून राजन परबचा खून केल्याचे कबुल केले. या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

X
COMMENT