लालकृष्ण अडवाणींची जनचेतना / लालकृष्ण अडवाणींची जनचेतना रथयात्रा महाराष्ट्रात दाखल

प्रतिनिधी

Nov 03,2011 12:37:14 AM IST

सिंधुदुर्ग । भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भ्रष्टाचार विरोधी रथयात्रा दुस-या टप्प्यात बुधवारी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यामध्ये दुपारी रथयात्रेचे आगमन झाले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार, एकनाथ खडसे, किरीट सोमय्या आदी नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. कोल्हापुरातील जाहीर सभेनंतर येथेच मुक्काम असेल. गुरुवारी अडवाणींची पुण्यात जाहीर सभा होणार असून तीन दिवस त्यांची यात्रा राज्यात असेल.

X
COMMENT