आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Nilesh Rane Press In Ratnagiri

निलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात गुहागर विधानसभा लढण्याची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि सिंधुदूर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले तर त्यांच्याकडून अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून राज्याचे मंत्री भास्कर जाधव येथून आमदार आहेत. निलेश राणे येथून उभे राहिले तर, कोकणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पाहायला मिळेल.
लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला आहे. याचे शल्य त्यांना आहे. या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. भास्कर जाधव यांना पैसा आणि सत्तेची मस्ती चढली असल्याचा आरोप करत, ती उतरवण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. निलेश राणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या या निर्णयाची नारायण राणे यांना माहिती नसल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, नारायण राणेंना माहित नाही निलेश राणेंचा निर्णय