Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | madhv gadgil report for environment

माधव गाडगीळ समितीच्या अहवालास विरोध करणार- राणे

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 28, 2012, 01:03 PM IST

पश्चिम घाट अहवाल स्वीकारू नये, अशी माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.

  • madhv gadgil report for environment

    रत्नागिरी- सह्याद्रीसह कोकण आणि केरळपर्यंतची संपूर्ण ‍निसर्ग संपदा जपण्यासाठी स्थापन केलेल्या बहुचर्चित माधव गाडगीळ समितीने नुकसाच अहवाल सादर केला आहे. परंतु हा पश्चिम घाट अहवाल स्वीकारू नये, अशी माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.
    गाडगीळ समितीच्या अहवालाबाबत राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्य केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची लवकरच भेट घेणार आहेत. असे राणे यांनी सांगितले.
    गाडगीळ समितीने अभ्यास करून तयार केलेला अहवाल केंद्र शासनाला नुकताच सादर केला आहे. त्यात पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याचे म्हटले आहे.
    या अहवालाची अंमलबजावणी झाली तर राज्याच्या विकासाला खीळ बसणार असल्याने हा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारू नये, अस राणे यांनी सांगितले आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील आघाडी सरकार या अहवालास विरोध करणार आहे.

Trending