Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mahad shivaji maharaj statue chatr

बंदी झुगारून रायगडावर बसवले पंचधातूचे छत्र

प्रतिनिधी | Update - Jun 03, 2012, 02:52 AM IST

पुरातत्त्व खात्याची बंदी झुगारून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलो वजनाचे पंचधातूचे छत्र बसवले.

  • mahad shivaji maharaj statue chatr

    महाड - पुरातत्त्व खात्याची बंदी झुगारून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलो वजनाचे पंचधातूचे छत्र बसवले.
    छत्र बसवण्यास केंद्राच्या पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. तसेच त्या ठिकाणी जमावबंदीचे कलम 144 लावण्यात आले होते. मात्र शनिवारी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 338 वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे छत्र बसवण्यात आले. हे छत्र काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने पारंपरिक वेशभूषा, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन
    करण्यात आले होते.

Trending