महाराष्‍ट्राची सुंदरी ठरली / महाराष्‍ट्राची सुंदरी ठरली रागिणी दुबे

दिव्य मराठी नेटवर्क

May 17,2013 11:55:00 AM IST

रत्नागिरी - महाराष्‍ट्र सुंदरी स्पर्धा रत्नागिरीत पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रागिणी दुबेने 'महाराष्‍ट्र सुंदरी' चा मुकूट पटकावला. यामुळे रागिणीची गोव्यात होणा-या राष्‍ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी थेट प्रवेश झाला आहे. देवगडची मयुरी राणे व मुंबईची नयना मुके या स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. ही स्पर्धा एकूण तीन फे-यांमध्‍ये पार पडली. त्यात 21 तरूणींनी सहभाग घेतला होता. रत्न‍ागिरीची कस्तुरी रेडीज बेस्‍ट स्माईल, बेस्‍ट कॅटवॉक नयना मुके, सुरभी हांडे बेस्ट फोटोजेनिक फेस, हेमा गाडिया बेस्‍ट हेअर, बेस्ट कॉस्च्युम मयुरी राणे आणि शुभांगी नांगर बेस्ट पर्सनॅलिटीच्या मानकरी ठरल्या.

X
COMMENT