कोकणात मान्सूनचे आगमन, / कोकणात मान्सूनचे आगमन, किनारपट्‍टीलगत सतर्कतेचा इशारा

दिव्य मराठी वेब टीम

Jun 06,2012 05:05:22 PM IST

रत्नागिरी: दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या भोवर्‍यात सापडलेल्या महाराष्ट्रावर एक दिवस आधीच वरुण राजाची कृपा झाली. कोकण किनारपट्टीवर मान्सून धडकला आहे. रत्नागिरीसह परिसरात मंगळवारीच पावसाने हजेरी लावली होती. आजही काही भागात दमदार पाऊस झाला. वातावरणात गारवा निर्माण झाला असल्याने उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.
गणपतीपुळेच्या समुद्र किनार्‍यावर उंच लाटा उसळल्या आहे. या लाटांमुळे किनारपट्टीवरील दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. येत्या दोन दिवसात तो मुंबईत येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

X
COMMENT