मराठा समाजाचा एल्गार / मराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ

Oct 16,2016 03:42:00 PM IST
रत्नागिरी- मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार आता कोकणातही पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्येही रविवारी सकाळी मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. पवन तलाव ते प्रांतकार्यालय या मार्गावर हा मोर्चा निघाला.

खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक राजकीय नेतेही मोर्चात सहभागी झाले होते.

प्रांत कार्यालयाजवळ मराठा मूक क्रांती मोर्चाची सांगता करण्यात आली. दहा तरुणींकडून जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्याती कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
या मोर्चामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आली होती. दापोली, रत्नागिरी, राजापूरातून मोर्चेकरी चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर पाहा, चिपळूणमध्ये धडकल्या भगव्या वादळाचे छायाचित्रे....
X