मारुती कार आयशर / मारुती कार आयशर टेम्पोला धडकली, चारजण जखमी

प्रतिनिधी

Oct 29,2011 12:57:24 PM IST

रत्नागिरी - भाऊबीजेसाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारला शहरातील टीआरपी येथे आयशर टेम्पोला धडक लागून अपघात झाला. या अपघातात, सासू-सुनेसह, एक मुलगी व चालक जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला.
मिरज येथील श्रीधर गोविंद बेडेकर (४२) हे आपली मारुती कार (एम.एच. १० ई १६५९) घेवून पुणे येथून रत्नागिरी कडे भाऊबीजेसाठी निघाले होते. टीआरपी येथे पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन त्यांची कार घसरली व त्याचवेळी एमआयडीसीतून कुंवरबावकडे जाणा-या (एम.एच.०८ ए.क्यू. ०२८१) या आयशर टेम्पोला धडक बसून अपघात झाला. हा टेम्पो बाबूलाल पटेल हे चालवित होते.
अपघातात मारुती कारमधील श्रीधर बेडेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांची मुलगी ऐश्वर्या (१६) पत्नी जान्हवी (३७) आणि आई राधा गोविंद बेडेकर (६५) या चौघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पो चालक पटेल यानेच अपघाताची माहिती पोलिस स्थानकात दिली. अधिक तपास पोलिस हवालदार धोपावकर करीत आहेत.

X
COMMENT