Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | mns going on fast for improvement of roads

आंबवलीतील रस्‍त्यांच्या दूरूस्तीसाठी मनसेचे उपोषण

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 08, 2013, 12:08 PM IST

आंबवलीतील (ता.खेड) रस्‍त्यांची दुरूस्‍ती करावी या मागणीसाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारीपासून (ता.सात) आमरण उपोषण सुरू करण्‍यात आले आहे.

  • mns going on fast for improvement of roads

    मोरवंडे : आंबवलीतील (ता.खेड) रस्‍त्यांची दुरूस्‍ती करावी या मागणीसाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारीपासून (ता.सात) आमरण उपोषण सुरू करण्‍यात आले आहे.

    उपोषणाच्या पहिल्याच दिवशी एका आंदोलकाची तब्येत खालवल्याने त्याला कळबंणी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.आंबवलीतील उखडलेल्‍या रस्यावरून नियमित वाहतूक करण्‍ो तसेच रूग्ण किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात नेणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.रस्त्यांच्या दुरूस्तीविषयक वेळोवेळी निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देऊन ही काही उपयोग झाले नसल्याने आम्ही उपोषण करत आहोत असे मनसेच्या महेश मोरे यांनी सांगितले.उपोषणकर्त्यांच्या घोषणांनी तहस‍ील कार्यालय दणाणून गेले होते.

Trending