आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, कोकण रेल्वेही थांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आसुर्डेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहनांना पुढे जाण्यात मोठा अडथळा येत आहे. कोकण रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत. या पावसामुळे संगमेश्वरमधील माखजन गावाचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर रेल्वस्थानवकावर पाणी साचले असून अनेक पुलांवर पाणी आले आहे. पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे रुळांवर चिखल आणि माती साचल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे.