आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai's Sub Police Inspector Sexual Exploitation Of Lady

युवतीचे लैंगिक शोषणाप्रकरणी मुंबईचा फौजदार अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग - लग्नाचे आमिष दाखवून औरंगाबाद येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील विशेष सुरक्षा दलास पोलिस उपनिरीक्षक असलेल्या स्वप्निल रविकांत थळे (वय 29) हा प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत आला होता. या वेळी त्याचे तेथील एका युवतीशी सूत सुळले. त्यांच्या नियमित भेटीगाठीही सुरू झाल्या. अहमदनगर, पुणे व औरंगाबाद येथील हॉटेल्समध्ये राहून स्वप्निलने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचेही या युवतीने पोयनाड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


सुमारे अडीच वर्षे या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. नंतर मात्र युवतीला न कळू देता स्वप्निलने दुस-याच युवतीशी विवाह केला. हा प्रकार कळताच पीडित तरुणी स्वप्निलला जाब विचारण्यासाठी गेली. मात्र, तिला हुसकावून लावण्यात आले. स्वप्निलची आई व बायकोने तिला शिवीगाळ व मारहाणही केली. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून स्वप्निलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. त्याची आई व बायकोवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मदत करणा-यास बंदुकीचा धाक
स्वप्निलच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्यानंतर पीडित तरुणीने शैलेश पाटील या युवकाच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वप्निलने शैलेशला रस्त्यातच गाठले व रिव्हॉल्व्हर त्याच्या डोक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद केले आहे.