Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | nanijdham free ambulance service start ratnagiri

नाणीज संस्थानने सोडला मोफत रुग्णसेवेचा संकल्प

प्रतिनिधी | Update - May 14, 2012, 05:22 AM IST

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे नुकत्याच झालेल्या वारी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • nanijdham free ambulance service start ratnagiri

    नाणिज - श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे नुकत्याच झालेल्या वारी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मोफत सेवेसाठी 14 रुग्णवाहिका दानशूरांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते संस्थानकडे सुपूर्द केल्या.
    वारी उत्सवानिमित्त सुंदरगड भाविकांनी फुलून गेला होता. गडावर दोन दिवस काकडआरती, अभिषेक, धुपारती, रुद्र स्वाहाकार याग यासारखे धार्मिक कार्यक्रम झाले. सांगत सोहळ्यास देशभरातील भाविक व अनेक आखाड्यांचे साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील महामार्गावर होणा-या अपघातातील जखमींना तातडीने दवाखान्यात नेता यावे, त्यांचे प्राण वाचण्यास मदत व्हावी म्हणून नरेंद्राचार्यजी महाराज यांनी राज्यभर मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत अशा 13 रुग्णवाहिका मुंबई-गोवा व मुंबई- गुजरात राष्ट्रीय महामार्गावर सेवे देत आहेत. त्यामुळे आजवर शेकडो जखमींचे प्राण वाचले आहेत. वारी कार्यक्रमात दानशूरांनी आणखी 14 रुग्णवाहिका संस्थानकडे समर्पित केल्या. या रुग्णवाहिका आता मुंबई-आग्रा, मुंबई- हैदराबाद या महामार्गावर मोफत सेवा देणार आहेत.

Trending