आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळी बाधवांनी उत्साहात साजरी केली नारळी पोर्णिमा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - नारळी पोर्णिमा हा सण मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद ठेवण्यात येते. खवळलेल्या समुद्रात कुठली अप्रिय घटना मासेमारी करणार्‍यांवर येऊ नये म्हणून आणि खवळलेला समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी परंपरेनुसार समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार करण्याची देखील परंपरा आहे.
महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. नारळी पोर्णिमेनंतर क़ोळी बांधव मासेमारी करण्यास सुरूवात करतात. समुद्रकिनारी राहणार्‍या बांधवांसाठी हा सण आनंद देणारा असतो.