राणेंना राजकारणात किंमत / राणेंना राजकारणात किंमत नाही; टीकेनंतर उध्दव यांनी डागली राणेंवर तोफ

Jul 20,2014 08:17:00 PM IST
करमाळाः कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी केलेल्या टिकेला उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी राणेंना राजकारणात किंमत नाही, त्यांना काय करायचे करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात सोलापूरच्या करमाळा मेळाव्यात तोफ डागली आहे.
दरम्यान केसरकरांनीही राणेंनी केलेल्या टिकेविरोधात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसमध्ये एकाकी पडत चाललेले पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा नाराजीने नाही तर, प्रसन्न मनाने देत आहे. काँग्रेस पक्षाने जे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण न केल्यामुळे राजीनाम देत असल्याचे त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि सावंतवाडीचे आमदार केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर केसरकरांनी राणेंचा तोल ढासळल्याचा आरोप करत त्यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'उद्धवचे कर्तृत्व आणि अस्तित्व काय आहे. त्यांची सरपंच होण्याची लायकी नाही.' पुण्य करणार्‍यांना शांती लाभते असे सांगत, लोकांचे शोषण करणार्‍यांना शांतता लाभत नाही असे लोक शांती मिळविण्यासाठी कुठे जातात हे मला माहित असल्याचे ते म्हणाले.
नुकतेच शिवसेनेत गेलेले सावंतवाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना मतदार संघाबाहेर कोणी ओळखतो का? असा सवाल करुन, हे राहातात गोव्याला आणि सावंतवाडीचा विकास करण्याच्या गप्पा मारतात, अशी टीका त्यांनी केली.
राणेंवर टीका केली की वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जागा मिळते, त्यामुळे जिल्ह्यातील लोक माझ्याविरोधात बोलत असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मुंबईतील पत्रकार परिषदत घोषणा केल्यानंतर ते नवा पक्ष स्थापन करणार, शिवसनेत जाणार किंवा मनसेत जाणार अशी चर्चा होती. शुक्रवारी याबद्दल पत्रकारांनी उद्धव यांना विचारले असता ते म्हणाले होते, 'राणेंना आता सांत्वनाची गरज आहे. त्यांना कोणत्या तरी पक्षात मन:शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.'

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मनःशांतीच्या प्रार्थनेचा समाचार घेताना राणे म्हणाले, 'उद्धव यांना मी प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देईल. जे पुण्य करतात त्यांना मनःशांती मिळतेच. मात्र, जे शोषण करतात त्यांना खरी मनःशांतीची गरज असते आणि त्यासाठी ते कुठे जातात हे मला माहित आहे.'

शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केले असा सवाल करुन, मेळाव्यासाठी उपस्थित जनतेला सिंधुदुर्गमधील मेडीकल कॉलेज आणि इतर शिक्षण संस्था पाहण्याचे आवाहन राणेंनी केले.

पुढील स्लाइडमध्ये, राणे गँगस्टर
X

Recommended News