Home »Maharashtra »Kokan »Ratnagiri» Narayan Rane On Ajit Pawar In Sindhudurg

अजित पवार म्हणजे खराब झालेला टेपरेकॉर्डर : राणे

प्रतिनिधी | Feb 01, 2012, 03:42 AM IST

  • अजित पवार म्हणजे खराब झालेला टेपरेकॉर्डर : राणे

सिंधुदुर्ग - कोकणात दादागिरी असल्याचा आरोप करणा-यांनी पुण्यात कोणाची दादागिरी आहे हे आधी पाहावे. अजित पवार हा खराब झालेला टेपरेकॉर्डर असून त्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. त्यामुळे आजच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र प्रत्यक्षात 8 फेब्रुवारीला पुण्यात जाऊन आपण राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करू, असे सांगून राणेंनी आज आपल्याच घोषणेतील हवा स्वत:च काढून घेतली.
सोमवारी राणे समर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राणे आज राष्ट्रवादीवर जास्तच चिडले होते. ते म्हणाले की, सिंधुदुर्गात दहशतवाद आहे असे म्हणणा-यांनी आपल्या पुण्यात किती दहशतवाद आहे हे आधी पाहावे. परंतु यांची टगेगिरी आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही. वेंगुर्ल्यातील दंगलही राष्ट्रवादीनेच घडवली असल्याचा आरोप त्यांनी केला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचं निवडणून येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. काँग्रेस आणि नारायण राणे यांच्यावर काही जण टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा घेतल्याचे राणे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा कोकणाला बदनाम करण्याचा डाव आहे. कोकणात पर्यटन होऊ नये म्हणून अजितदादा आणि इतर राष्ट्रवादीचे नेते मुद्दामहून अशा प्रकारे षडयंत्र रचत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. या वेळी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गापेक्षा पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे. याबाबत पुरावेच सादर केले. खुन, दरोडे, चोऱ्या, बलात्कार यात पुणे जिल्हा आघाडीवर असल्याची आकडेवारीच सादर केली. पुण्‍यातील जनता असुरक्षित असल्‍याचे राणे म्‍हणाले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कोकणात यावे, कोंबडी वडे खावे आणि जावे, इथे येऊन दहशतवाद असल्याचे म्हणू नये. आकडेवारीवरून असे दिसते की पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तेथील लोक असुरक्षित आहेत. ट्रक आणून कोथरूड सारख्या भागात दरोडे टाकले जातात. मग, कुठे आहे त्यांचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री? का ते यावर नियंत्रण आणू शकत नाहीत, असा सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.पुण्यात सिनिअर सिटीझन क्लब

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सिनिअर सिटीझन क्लब काढला आहे. त्यांना तेथे माणसं मिळत नाही म्हणून आता सिंधुदुर्गातून माणसे घेऊन जात असल्याचे नारायण राणे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर तोंडसुख घेताना सांगितले.आर. आर. पाटील यांच्यावर टीका

गृहमंत्री आर. आर. पाटील यांना केवळ नारायण राणे दिसतात. अरे, नक्षलवादी सामान्यांना मारत आहेत, कुठे गेले आर. आर. पाटील? अशा ते माईकसमोर येतात आणि आम्ही जशास तसे उत्तर देऊ. प्रत्येकवेळी आपले हेच उत्तर! दरोडे, खून, दहशतवादी हल्ला याचे आपले एकच उत्तर! अरे तू करतोस काय? असा सवाल राणे यांनी केला. माझ्या मुलावर हल्ला करणाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर काढण्याचे काम राष्ट्रवादीच्या एका जबाबदार मंत्र्यांने केल्याचा आरोप नारायण राणेंनी आर. आर. पाटील यांचे नाव न घेता केला.
शंकर कांबळी यांचा राणेंना धक्‍का, राष्‍ट्रवादीमध्‍ये प्रवेश
नारायण राणे विरोधकांना कॉँग्रेसचे ‘बळ’
राणे-जाधव वादात ‘टग्या’ शेपटा का घालतो?
राणे यांचे कट्टर समर्थक जयवंत परब पुन्हा शिवसेनेतNext Article

Recommended