नारायण राणेंची समर्थक / नारायण राणेंची समर्थक सोडू लागले साथ, सिंधुदूर्गात काँग्रेस अंतर्गत वाद विकोपाला

Jul 15,2014 03:20:00 PM IST
सिंधुदूर्ग - लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिधुदूर्ग मतदारसंघातून मुलगा निलेशच्या पराभवानंतर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजकीय स्थानालाच धक्का बसला आहे. या पराभवामुळे राणेंचे समर्थकही हळू-हळू त्यांची साथ सोडून जाताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला वैतागून राणेंचे जुने कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेकडे जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सिंधुदूर्ग मधील राणेंचा दबदबा कमी होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये राणे एकटे पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातही काँग्रेसचे नवे आणि जुने कार्यकर्ते यांच्यात वाद सुरु आहे. यामुळे अनेक काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जुन्या घरी परतत आहेत.
पराभवाचे खापर समर्थकांवर फोडल्याने नाराजी
राणेंचे चिरंजीव नितेश यांनी भाऊ निलेशच्या पराभवाचे खापर राणे समर्थकांवर फोडले आहे. यामुळे संजय तेली, राजन पडते, सतीश सावंत आणि काका कुडाळकर नाराज झाले आहेत.
शिवसेनेकडे जाण्याच्या विचारात
नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांची नारायण राणेंची भेट घेऊन तक्रार करण्याची इच्छा होती. मात्र, राणे काही त्यांना भेटले नाही. कार्यकर्त्यांबद्दल राणे यांची ही वृत्ती त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. मुलाने पराभवासाठी समर्थकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर राणेही भेटायला तयार नाही. यामुळे सिंधुदूर्गातील राणे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदिल दिला आहे.

छायाचित्र : नारायण राणेंचे संग्रहित छायाचित्र
X

Recommended News