आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar To Address A Rally At Ratnagiri, Divya Marathi

राष्‍ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता निलेश राणेंसाठी काम करणार- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग - कॉग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा कोणत्‍याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्‍ट्रवादीचे आमदार दीपक केसकर यांनी घेतली आहे. दीपक केसकर यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीमध्‍ये दुही माजली आहे. मात्र, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्‍ये सभा घेऊन कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. आता राष्‍ट्रवादीचा प्रत्‍येक कार्यकर्ता निलेश राणेंचा प्रचार करणार असल्‍याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये झालेल्‍या सभेमध्‍ये शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. पवार म्‍हणाले, ऐन निवडणुकीच्‍या काळात आमच्‍या पक्षातील काहींना अवदसा आठवली. अन् त्‍यांनी आपापसात वाद घालणे सुरु केले. एकाच घरात राहतात तर भांड्याला भांडे लागतच असते, असे म्‍हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरु असलेली धुसफूस कमी करण्‍याचा प्रयत्न केला. आपापसात मतभेद असले तरी देशाच्‍या विकासासाठी आपण एकत्र यायला हवे, असेही पवारांनी सांगितले.


कारणे दाखवा नोटीस
शरद पवार यांनी दीपक केसकर यांना पक्षांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावल‍ी आहे. पक्षाने घेतलेल्‍या निर्णयाविरुध्‍द भूमिका घेतल्‍याने त्‍यांना नोटीस देण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येते.

केसकरांचा राजीनामा
कोणत्याही परिस्थितीत निलेश राणेंचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्‍यांनी पक्षश्रेष्‍ठींचा आदेश न मानता त्‍यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.शरद पवार यांच्या सभेपूर्वीच केसरकरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दहशतवादाला विरोध करत आपण व्यक्तिगत हा निर्णय घेतल्याचे, केसरकरांनी म्हटले आहे.