आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणीजजवळ अपघातात एक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्‍नागिरी- रत्‍नागिरी-कोल्‍हापूर मार्गावरील नाणीज मठासमोर एका मालवाहू ट्रकखाली सापडल्‍याने तरूण जागीच ठार झाला. शनिवारी सांयकाळी साडेसातच्‍या दरम्‍यान हा अपघात झाला.

गणेश संभाजी साखरे (वय 29, रा. उमरखेड, जि. यवतमाळ) असे तरूणाचे नाव आहे. तो नाणीजला उत्‍सवासाठी आला होता. त्‍यावेळी एमएच-09-सीए-0626 या चिकोडीला कोळसा घेऊन जाणा-या ट्रकखाली हा तरूण सापडला. या अपघातात तो जागीच ठार झाला. ट्रकचालक पांडुरंग बाबुराव नागरगोजे (वय 40) याला पोलिसांनी अटक केली आहे.