दापोलीत विजेच्या तारेला चिकटून वृद्धाचा मृत्यू
दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 06, 2012, 03:47 PM IST
दापोली तालुक्यातील दाभोळजवळील गुडघे या गावात एका वृद्धाचा वीजेच्या खांबावरून तुटून तारांना चिटकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
-
रत्नागिरी- दापोली तालुक्यातील दाभोळजवळील गुडघे या गावात एका वृद्धाचा वीजेच्या खांबावरून तुटून तारांना चिटकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयवंत दांडेकर (वय-95) या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी घटना घडली.
दापोली तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. जोरदार वार्यासह विजेचे खांब अनेक ठिकाणी कोलमडले आहेत.
विद्युत प्रवाह सुरु असताना तार खाली कोसळले. या तारांना चिटकून दांडेकरांचा मृत्यू झाला. वीज कंपनीचा बेपर्वाईपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.