आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोकणातील नेते परशुराम उपरकरांची शिवसेनेला सोडचिठ्ठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कणकवली- शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. विनायक राऊत तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांच्या राजकारणाला कंटाळून उपरकरांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून खेडमध्ये राज ठाकरे यांच्या होणार्‍या जाहीर सभेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचे कळते.

उपरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. खेडमध्ये राज ठाकरेंची शु्क्रवारी सभा आहे. या सभेत उपरकारांसह शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्तेही सहभागी होणार असून ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. उपरकरांसारख्या मोठ्या नेत्याच्या सोडचिठ्ठीमुळे शिवसेनेला धक्का बसल्याचेही बोलले जात आहे.