Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | pregnant woman and her baby saved by doctors

सलाम डॉक्‍टरांनाः बिकट परिस्थितीत प्रसुती करुन वाचिवले बाळ-बाळंतीणीचे प्राण

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 01, 2013, 05:55 PM IST

मालवणजवळ छोट्याशा गावात हा प्रसंग मध्‍यरात्रीच्‍या सुमारास ओढावला होता.

 • pregnant woman and her baby saved by doctors

  मालवण- आज आहे डॉक्‍टर्स डे. रुग्‍णांसाठी डॉक्‍टर हा देवदूतच असतो. डॉक्‍टरांच्‍या तत्‍परतेने शेकडो रुग्‍णांचे प्राण वाचले आहेत. वेळेची तमा न बाळगता रुग्‍णाला वाचविण्‍यासाठी डॉक्‍टर धावून जातात. याची प्रचिती देणारी एक घटना मालवणजवळ एका छोट्याशा गावात घडली.

  मध्‍यरात्रीच्‍या सुमारास एका गर्भवतीला अचानक प्रसव वेदना सुरु झाल्‍या. वैद्यकीय सुविधा त्‍या गावापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या मालवणमध्‍येच उपलब्‍घ आहे. तिच्‍या पतीने तिला रिक्षातून मालवणकडे नेतो. परंतु, रस्‍तेतच तिची अवस्‍था अतिशय गंभीर होते. मोबाईलवरुन तो ग्रामिण रुग्‍णालयात संपर्क करुन डॉक्‍टरांना सर्वकाही संगतो. त्‍यानंतर डॉक्‍टर रुग्‍णवाहिका घेऊन तिथे पोहोचतो. या डॉक्‍टरांनी 15 किलोमीटर अंतर कापून त्‍या महिलेची प्रसुती केली आणि बाळ-बाळंतीण दोघांनाही वाचविले. विशेष म्‍हणजे, त्‍या रिक्षामध्‍येच तिची प्रसुती झाली. तिने एका मुलीला जन्‍म दिला.

  कशी केली डॉक्‍टरांनी मदत, वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...

 • pregnant woman and her baby saved by doctors

  मालवणजवळच्‍या बिळवस फाट्यावर ही घटना घडली. बेलाची वाडी येथे बजरंग सिंह हे गरिब एक कुटुंब राहते. मजुरी करुन त्‍यांचा उदरनिर्वाह चालतो. त्‍यांची पत्‍नी सुमनला रात्री 11 च्‍या सुमारास अचानक प्रसव वेदना सुरु झाल्‍या. त्‍याने रिक्षा आणून तिला मालवणला नेले. परंतु, अर्ध्‍या मार्गावरच तिचे बाळ अर्धवट बाहेर निघाले. प्रसंग अतिशय कठीण होता. तिच्‍या पतीने डॉक्‍टरांना संपर्क केला. ग्रामिण रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले. तत्‍काळ ते रुग्‍णवाहिका घेऊन तिथे पोहोचले आणि प्रसुती केली. त्‍यानंतर बाळ-बाळंतीणीला ग्रामिण रुग्‍णालयात नेऊन पुढील उपचार केले. दोघेही आता सुखरूप आहेत. परंतु, डॉ. पांचाळ यांनी कर्तव्‍यदक्षता दाखवून बाण प्रसंग ओळखला आणि शीघ्र कृती केली. त्‍यामुळे त्‍यांचे जिल्‍ह्यात कौतूक होत आहे. समाजाला अशाच कर्तव्‍यदक्ष डॉक्‍टरांची गरज आहे. आज डॉक्‍टर्स डे आहे. यानिमित्ताने अशा कर्तव्‍यदक्ष डॉक्‍टरांचे divyamarathi.com कडूनही अभिनंतदन.

  फोटो- डॉ. सुरेश पांचाळ

Trending