Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | protest against Jaitapur Nuclear Power Project

जैतापूर प्रकल्पस्थळापासून एक किलोमीटर संचारबंदी

प्रतिनिधी | Update - Jan 02, 2013, 11:52 AM IST

पोलिस प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या एक किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे.

  • protest against Jaitapur Nuclear Power Project

    राजापूर - जैतापूर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प जोपर्यंत रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलक शांत राहाणार नाहीत, असा इशारा विरोधकांनी दिली आहे. आज (२ जानेवारी) प्रकल्पस्थळाला वेढा घालण्याचे आंदोलन प्रकल्पविरोधकांकडून केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या एक किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वीची आंदोलने पाहाता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे.

    प्रशासनाने २०० हून अधिक प्रकल्पविरोधकांना नोटीस बजावली आहे. त्याकडे दुर्लक्ष्य करत आंदोलक जमा झाले. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणापर्यंत जाऊ द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे.

Trending