शिवसैनिकांपुढे नमले पोलिस; / शिवसैनिकांपुढे नमले पोलिस; पुष्पा भावेंचा चिपळूणमधील कार्यक्रम रद्द?

Jan 08,2013 12:03:00 PM IST

चिपळूण - येथील एका कार्यक्रमातून ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांना वगळण्यात आले आहे. चिपळूणयेथील एका पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुष्पा भावे चिपळूणमध्ये येणार होत्या. शिवसैनिकांनी भावे कार्यक्रमास उपस्थित राहिल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत, पोलिसांमार्फत त्यांना मज्जाव केला. पोलिसांनी भावे यांना कार्यक्रमास उपस्थित राहू नका अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनीही या कार्यक्रमास गैरहजर राहाण्याचे मान्य केले आहे.

चिपळूण मध्ये होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला भावे यांनी विरोध केला होता. त्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी त्यांना चिपळूणमध्ये येण्यास विरोध केला आहे.

X