Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | rain in ganpatipule. kankavali- kolhapur road block

कणकवली-कोल्हापूर मार्गावर दरड कोसळली; गणपतीपुळ्यात मुसळधार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 02, 2012, 04:22 PM IST

करूळ घाटात दरड कोसळल्याने कणकवली- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  • rain in ganpatipule. kankavali- kolhapur road block

    रत्नागिरी: करूळ घाटात दरड कोसळल्याने कणकवली- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक फोंडामार्गे वळविण्‍यात आली आहे. कोकणात पाऊस सक्रीय झाला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरळ कोसळली. मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु आहे. संध्याकाळपर्यंत मार्ग मोकळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
    गणपतीपुळे परिसरात मुसळधार पाऊस
    गणपतीपुळे रत्नागिरीतही पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याचे परिसरातील नद्या, नाले वाहू लागले आहे. शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे नवे संकट उभे राहीले होते.

Trending