Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Ratnagiri Crime attack on Police Officer

रत्नागिरी : भल्या पहाटे पोलिस उपनिरीक्षकाला जीवंत जाळले

प्रतिनिधी | Update - Oct 06, 2013, 01:38 PM IST

हाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असून ते 90 टक्के भाजले आहेत.

  • Ratnagiri Crime attack on Police Officer

    रत्नागिरी - सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असून ते 90 टक्के भाजले आहेत. रत्नागिरी पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पेवेकर यांच्यावर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडरकर सामाजिक न्याय भवन येथे एका टोळक्याने हल्ला केला आणि नंतर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    आज (रविवार) सकाळी 6.30 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. एवढ्या सकाळी पेवेकर येथे कसे आले याचा तपास पोलिस करत आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पेवेकर यांच्यासोबत सकाळी येथे सहा जण वाद घालत होते. त्यानंतर त्या सहा जणांनी त्यांच्या आंगावर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. डॉक्टरांनी ते 90 टक्के भाजले असल्याचे सांगितले आहे.

    पेवेकर यांनी दिलेल्या जबाबात राजेंद्र गावडे आणि सुनील पवार आणि इतर चौघांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे. वयक्तिक वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Trending