आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद मागे घेतल्यानंतर बोटी समुद्रात , मासे खरेदीसाठी गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनामुळे गेल्या दहा दिवसांपासून ठप्प असेलली मच्छिमारी मंगळवारी सुरु झाली. मच्छिमारांनी त्यांच्या बोटी समुद्रात उतरवल्या आणि ताजी-ताजी मासळी बाजारात दिसायला लागली. त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या.

मच्छिमारांना दिल्या जाणा-या डिझेलच्या किंमतीत ११ रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे मच्छिमारांनी मच्छिमारी बंद केली होती. यामुळे जवळपास ३० कोटींची उलाढाल ठप्प पडली होती. मंगळवारी मच्छिमारांनी त्यांच्या बोटी समुद्रात उतरविल्या त्यामुळे मच्छिमारीसंबंधीच्या व्यवसायात धावपळ दिसून आली. सायंकाळी मासळी बाजारात ताजी मासळी आल्याने ग्राहकांचीही त्यावर झुंबड उडाली होती.