लेप्टोच्या साथीचे रत्नागिरीत / लेप्टोच्या साथीचे रत्नागिरीत थैमान

प्रतिनिधी

Jul 12,2012 02:15:15 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरीत मागील दोन वर्षापूर्वी उसळलेली लेप्टोची साथ यंदाच्या पावसाळ्यातही डोकवर काढतांना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण लेप्टोच्या उपचारासाठी दाखल झाले आहेत. लेप्टोच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असून, जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसून येत आहे.
रूग्णालयात उपचार घेणार्‍या पाच रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्याविभागातर्फे गावागावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच, वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे लेप्टोच्या निदानासाठी लागणार्‍या ब्लड सेपरेशन युनिट ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटरच नसल्यामुळे हे युनिट जिल्हा रुग्णालयात पडून आहे.X
COMMENT